ईतरसामाजिक

जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी अनिल सावंत यांचा पुढाकार;विविध खात्यांच्या कार्यालयात दिले निवेदन

विविध मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आंदोलनाचा इशारा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी अनिल सावंत यांचा पुढाकार;विविध खात्यांच्या कार्यालयात दिले निवेदन

विविध मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आंदोलनाचा इशारा

पंढरपूर(प्रतिनिधी):- मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, पोलीस स्टेशन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या ठिकाणी अनिल सावंत यांच्या पुढाकाराने पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्याने प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा येथे ये–जा करण्यासाठी अडचणी येत आहे ती अडचण दूर करावी व मंगळवेढा विभागातील एसटी बसेस ना दुरुस्त व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक वाटत आहे. अशा बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बस ची मागणी करावी बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले.

मंगळवेढा तालुका व शहरांमध्ये अवैद्य धंद्याचे जाळे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून तालुक्यांमध्ये खुले आम अवैध दारू विक्री, जुगार, मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैद्य व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणात्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनाणे करावे या मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.

मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचे काम व सब स्टेशन मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापूर, आंधळगाव, एमआयडीसी या लगतच्या सबस्टेशन मधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरांमधील व ग्रामीण भागामधील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले.

दिलेल्या सर्व मागण्याची वेळेवर अंमलबजावणी करावी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागांना देण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते लक्ष्मणराव ढोबळे सर,अनिल सावंत, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, माणिक गुंगे, सुरेश कांबळे, जमीर इनामदार, संभाजी भोसले, स्मिता अवघडे, संदेश काळुंगे, संजय मस्के, सागर गुरव, कृष्णा लोंढे, रमेश पवार, अजिंक्य बेंद्रे, विलास पाराधे, वाल्मीक लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close