क्राइम

मंगळवेढ्यात पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून हत्या

पत्नीने नांदण्यास दिला नकार;पतीने उचलले टोकाचे पाऊल

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मंगळवेढ्यात पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून हत्या

पत्नीने नांदण्यास दिला नकार;पतीने उचलले टोकाचे पाऊल

पती, सासू-सासर्‍या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर(प्रतिनिधी):- पती-पत्नीच्या भांडणांमध्ये गेल्या पाच वर्षापासून पत्नी आपल्या माहेरी मंगळवेढा येथे वडिलांच्या घरी राहत होती तिला नांदायला घेऊन जाण्यासाठी पती आपल्या आई-वडिलांसोबत मंगळवेढा येथे आले होते. पत्नीच्या भावाने दारातच बहीनीच्या सास-याला मारहाण सुरू केली. दरम्यान पत्नीने पतीस नांदायला येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने धारदार चाकूने पत्नीच्या पाठीत, पोटात व कमरेवर चाकूने वार करत भोसकून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मयत पत्नी आरती अमोल पाटील

आरती अमोल पाटील (वय ३२, रा. मेटकरी गल्ली, मंगळवेढा) असे मयत पत्नीचे नाव आहे. या हाणामारीत मयताचा सासरा अंबादास पाटील (ढेकळेवाडी), भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले (रा.मेटकरी गल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी गेल्या चार-पाच वर्षांपासून विवाहित आरतीचा पती सोबत वाद असल्याने ती माहेरी मंगळवेढा येथील शनिवार पेठेत आपल्या आई-वडिलांकडे राहत होती.

आरोपी पती अमोल अंबादास पाटील

सासरी नांदण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून पती व सासू-सासरे आल्यानंतर सास-याला मेव्हणा प्रसाद चौगुले याने मारहाण केली. पती अमोल याने पत्नीला नांदण्यास घेऊन जाण्यासाठी आलो आहे चल असे सांगताच तिने नांदण्यास येण्यासाठी नकार दिला. वडीलास होत असलेली मारहाण व पत्नीने दिलेला नकार यामुळे पती अमोल याने पत्नीच्या पोटात, पाठीत व कमरेत धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

तिला उपचाराकरिता प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी आरतीला मयत घोषित केले. इतर जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

याप्रकरणी मयत आरती हिची आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्याद दिली असून पती अमोल अंबादास पाटील, सासरा अंबादास पाटील, सासू विमल अंबादास पाटील यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल पाटील यास पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close