
संपादक – दिनेश खंडेलवाल
चि. रियांश च्या पहिल्या वाढदिवस सोहळ्यासाठी आपण यायचंय…
पत्रकार संजय लक्ष्मण कोकरे यांचे नातू श्री. व सौ. शुभम संजय कोकरे यांचे चिरंजीव
पंढरपूर::– पत्रकारिता क्षेत्रात त्याचबरोबर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हॉटेल व्यवसायिक असणारे संजय लक्ष्मण कोकरे यांचे नातू तसेच श्री. व सौ. शुभम संजय कोकरे यांचे चिरंजीव रियांश याचा प्रथम वाढदिवस सोहळा आप्तेष्ट, नातेवाईक तसेच मित्र परिवारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
रियांश म्हणतो मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय…. माझ्या आई-वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे. त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसेच आपणा सर्वांचे शुभ आशीर्वाद मिळावेत यासाठी आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचंय हे आग्रहाचं आहे.
आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता चिरंजीव रियांश शुभम कोकरे यांचा प्रथम वाढदिवस एकनाथ भवन जुनी माळी गल्ली येथे संपन्न होणार असून आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहून बाळाला शुभाशीर्वाद द्यावेत आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. हे आमंत्रण देत आहेत बाळाचे आजोबा पत्रकार संजय लक्ष्मण कोकरे व श्री. व सौ. शुभम संजय कोकरे, समस्त कोकरे परिवार…….