ईतरसामाजिक

“कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण”

पांडुरंग सह सा कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार संपन्न

संपादक – दिनेश खंडेलवाल 

“कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण”

पांडुरंग सह सा कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार संपन्न

आग्रहाचे आमंत्रण… आग्रहाचे आमंत्रण… आग्रहाचे आमंत्रण

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते गोरगरीब सर्वसामान्यांचे कैवारी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व म्हणजेच सरकारमध्ये पंढरीचा पांडुरंग या नावाने ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या दैदीप्यमान आकर्षक पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी दोन वाजता सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी सहकारातील डॉक्टर म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. दबघाईला आणि बंद अवस्थेत असलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जेतावस्था देत चांगल्या स्थितीत आणण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांना सहकाराचे डॉक्टर म्हणून संबोधले जात होते. व्यक्ती एक मात्र उपाध्या अनेक असे कार्य म्हणजेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक एसटी महामंडळ तोट्यात गेले असताना अध्यक्ष पद मिळाल्यानंतर एसटी महामंडळाला ऊर्जेतावस्था नव्हे तर चांगल्या स्थितीत आणण्याचे कार्यही स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या हातून घडले होते. पंढरपूर तालुक्यासह शहरातील जनतेने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख व सर्वसामान्यांचे दैवत असणारे थोरले मालक म्हणजेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास आज १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता पांडुरंग सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यावर प्रेम करणारे परिचारक परिवारावर प्रेम करणारे मानणारे अशा सर्वांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक याच्या वतीने आग्रहाचे आमंत्रण आहे.

श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणासाठी सर्व शेतकरी सभासद कार्यकर्ते तसेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक प्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना पंढरीचे पांडुरंग असे संबोधले जात होते. तर सोलापूर जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला लाभलेले विठुरायाच्या नगरीतील संत म्हणून ओळख होती. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शेतकरी कष्टकरी तसेच कामगार यांच्या कल्याणासाठी व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. कित्येक कुटुंबाचे कल्याण केले. अशा मानव रुपी ईश्वरी अवताराला कुणी संत,तर कुणी पंत, कुणी मालक म्हणून ओळखू लागले अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्या या ठिकाणी होत आहे. तरी सर्वांनी हेच आग्रहाचे निमंत्रण समजून उपस्थित राहावे असे आवाहन विधानपरिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close