
संपादक – दिनेश खंडेलवाल
आषाढी वारीचा शीणवटा घालविण्यासाठी स्थानिकांची मिनी एस्सेल वर्ल्ड कडे धाव
मनोरंजन नगरीतून होते लाखोंची उलाढाल खरेदीसाठी होतेय मोठी गर्दी

दिनेश खंडेलवाल
पंढरपूर:- आषाढी वारी उत्तम भरली असल्याने पंढरपूर शहराचे अर्थकारण चांगले झाले आहे. यंदाच्या आषाढी वारी मध्ये अंदाजे २२ ते २५ लाख भाविक आले होते. आषाढी वारीमध्ये बाल गोपाळासह अनेकाचे आकर्षण असलेले मिनी एस्सेल वर्ल्ड पंढरी नगरीच्या मध्य ठिकाणी अवतरले असून या मायावी अद्भूत मनोरंजन नगरी कडे हजारो भाविकांची,तरुणाईची पावले आपसूकच वळवत आहेत.

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ही मायावी नगरी पंढरीत दाखल होते. उंचच उंच आकाशपाळणा हे सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो. इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाश पाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या स्वप्ननगरीचे सौदर्य अलौकिक दिसत असते. रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो. हा आकाश पाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला जागतात, आनंद, जोश, अनोजे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव भाविकासह शहरवासीय अनुभवत आहेत. खिशाला परवडेल अशा माफक दरात विविध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद घेताना दिसतात.

पंढरपूर आषाढी वारीतील मनोरंजन वारीमध्ये उंच जाणाऱ्या आकाश पाळण्याचा आनंद घेताना भाविक, घेताना दिसतात गोलाकार आणि मधूनच तिरका होऊन फिरणारा मेरी गो राऊड, गोलात एकमेकाना धडकत जाणाऱ्या डॅशींग कार्स काळजाचा ठोका चुकत गोल मृत्युगोलात फिरणाऱ्या दोन वेगवान मोटारसायकल आणि एक मारुती कार, चिमुकल्यांचे आकर्षण असलेल्या पाण्यातील आगबोटी, मिनी ट्रेन, जीवनातल्या विविध समस्यांवर आपली भूमिका व्यक्त करणारे पन्नालाल गाढव, अनेक चित्र विचित्र प्रश्न विचारले की हे गाऊन प्रेक्षकांसमोर उभे राहते हा प्रकार अत्यंत विनोदी तेवढाच आफत आणणारा पण यातून मनोरंजन हाच एकमेव हेतू असतो. वारी झाली तरी पुढे पंधरा दिवस हे मिनी एसेल वर्ल्ड नागरिकांसह भाविकांचे मनोरंजन करते.

आषाढी वारी आली की विविध व्यवसायाबरोबर मनोरंजन वारीचेही आगमन होत असते, अनेक व्यवसाय होताच निघून जातात परंतु म नोरंजन वारीतील पाहणे, रेल्वे व इतर व्यावसायिक महिनाभर हा व्यवसाय करतात. कारण वारी झाल्यानंतर पंढरीतील स्थानिक नागरिक या मनोरंजन वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. ]



