सुफी संत अब्दुल इब्राहिम साहेब यांचे सुपुत्र आरिफ बाबा यांचे हृदयविकाराने दुःखद निधन
आंबेजोगाई च्या दफनभूमी मध्ये मोठा जनसमुदाय जमला होता

संपादक – दिनेश खंडेलवाल
सुफी संत अब्दुल इब्राहिम साहेब यांचे सुपुत्र आरिफ बाबा यांचे हृदयविकाराने दुःखद निधन
आंबेजोगाई च्या दफनभूमी मध्ये मोठा जनसमुदाय जमला होता

पंढरपूर(समीर तांबोळी):- अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी आणि मरहूम सुफी संत अब्दुल इब्राहिम साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र आरिफ इब्राहिम ऊर्फ अरिफ बाबा यांचे सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. या अनपेक्षित आणि क्लेशदायक घटनेने कुटुंबासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरिफ बाबा यांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. त्यामुळे त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

निधन समयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मुस्लिम समाजासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामीण भागात समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदरशांची स्थापना केली. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला तर समाज बांधवातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंबेजोगाई येथील दफन भूमी मध्ये त्यांना घेऊन जाताना महाराष्ट्रासह इतर प्रांतातून आलेले त्यांच्या शिष्यगणांचा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शोकाकुल वातावरणात त्यांचा दफनभूमी पार पडला.


