ईतरबिझनेस

‘आरबीआय आपल्या दारी’ पंढरपूर अर्बन बँकेत संपन्न

रिझर्व्ह बँकेचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

संपादक – दिनेश खंडेलवाल 

‘आरबीआय आपल्या दारी’ पंढरपूर अर्बन बँकेत संपन्न

रिझर्व्ह बँकेचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन व पंढरपूर अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे अधिकारी वर्गामार्फत ‘RBI आपल्या दारी’ हा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवारी पंढरपूर अर्बन बँकेच्या ‘कर्मयोगी सभागृह’ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मान्यवरांचे हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांचे वतीने मानवरांचा सत्कार करणेत आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर बँकिंग (सीएबी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर हरिप्रसाद पटनाईक तसेच संतोषजी पांडे यांनी रिझर्व बँक तपासणी व गुंतवणूक बाबत धोरणात्मक बाबी बाबत मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांची आर्थिक नाळ असणाऱ्या सहकारी बँकांना ‘आरबीआय आपल्या दारी’ – हा बँकिंग क्षेत्रासाठी मार्गदर्शक उपक्रम राबवित अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्र्म्हेचा म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून थेट ग्रामीण भागातील पंढरपूर अर्बन बँक येथे येऊन नागरी सहकारी बँकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बाब असल्याचे नमूद केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास नगर, सोलापूर, लातूर व धाराशिव आदी जिल्ह्यांमधून विविध नागरी सहकारी बँकांचे १६० हून अधिक पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान गुंतवणूक विषयक बाबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून होणारे परीक्षण, निरीक्षणातील त्रुटी तसेच दोष दुरुस्ती अहवाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन बँकिंग कामकाज अधिक सक्षमपणे व नियमानुसार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील यांनी पंढरपूर अर्बन बँकेने घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.

पंढरपूर अर्बन बँकेचे सीईओ उमेश विरधे यांनी आपल्या मनोगतात, “हे प्रशिक्षण म्हणजे आपल्याला मिळालेली एक महत्त्वपूर्ण संधी आहे. ‘ज्योत से ज्योती जलाते चलो’ या भावनेतून आपण येथे घेतलेले ज्ञान आपल्या बँकेतील सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवावे” असे आवाहन केले. यासाठी सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close