सामाजिक

पंढरपूरमध्ये सहा दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूरमध्ये सहा दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर(प्रतिनिधी):- श्री झलारिया पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य परमपूज्य स्वामी श्री घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि श्री सर्वजन हितेषी ट्रस्ट व श्री लक्ष्मणबाग देवस्थान, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिर २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री लक्ष्मणबाग देवस्थान, स्टेशन रोड, पंढरपूर येथे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट देऊन उपचाराचा लाभ घेतला.

आधुनिक थेरपीद्वारे उपचार

या शिबिरात अनुभवी तज्ञांमार्फत खालील थेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत –
१) फिजिकल थेरपी
२) ॲक्युप्रेशर थेरपी
३) व्हायब्रेशन थेरपी
४) कपिंग थेरपी

कोणत्या आजारांवर उपचार मिळणार?

मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, सांधेदुखी, संधिवात, डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर तज्ञांकडून तपासणी, मार्गदर्शन व उपचार केले जात आहेत.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुडघेदुखी आणि कंबरदुखीसाठी अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

ज्या रुग्णांकडे एक्स-रे, एमआरआय किंवा इतर तपासणी अहवाल असतील, त्यांनी ते अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पंढरपूर शहर व परिसरातील गरजू नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सर्वजन हितेषी ट्रस्ट आणि लक्ष्मणबाग देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close