राजकिय

शिक्षक मतदारसंघात मताधिक्यांचा होणार गनिमी कावा !

डॉ. बी.पी. रोंगे यांना अटीतटीची लढत, दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड

संपादक दिनेश खंडेलवाल 

शिक्षक मतदारसंघात मताधिक्यांचा होणार गनिमी कावा !

डॉ. बी.पी. रोंगे यांना अटीतटीची लढत, दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड

पंढरपूर(प्रतिनिधी):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे मतदान उद्या, दि. २३ रोजी होत असून, अखेरच्या टप्प्यात या निवडणुकीने चुरशीचे वळण घेतले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता गनिमी काव्याने रंगतदार झाली असून, पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

या निवडणुकीत डॉ. बी.पी. रोंगे आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यातच खरी लढत असल्याचे चित्र आहे.

रोंगे यांना अटीतटी, सावंत यांना सोपी वाट?

प्रत्यक्ष गाठीभेटी आणि शिक्षकांचा विश्वास संपादन करण्यात डॉ. बी.पी. रोंगे यांना ही निवडणूक कठीण आणि अटीतटीची जात आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यातच मताधिक्याला सुरुंग लागण्याची म्हणजेच गनिमी कावा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याउलट, माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांना शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि गेल्या अनेक वर्षांच्या संपर्कामुळे ही निवडणूक तुलनेने सोपी जात असल्याचे दिसत आहे. शिक्षकांमधील त्यांच्या कामाची पद्धत त्यांना फायदेशीर ठरत आहे.

पुणे-सोलापूर ठरणार निर्णायक

पाच महानगरपालिका आणि ५८ तालुक्यांतील शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. मात्र, सर्वाधिक मतदार असलेले पुणे आणि सोलापूर जिल्हे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या दोन जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सध्या मतदारसंघात एक वेगळीच चर्चा आहे. अनेक शिक्षकांनी प्रत्येक उमेदवारालाच “मतदान तुम्हालाच करतो” असे आश्वासन दिल्याने, नेमके मत कोणाला मिळणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. विविध आमिषे आणि ठोस आश्वासनांची खैरात सध्या सुरू असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये रंगली आहे.

एकंदरीत, आपला विजय निश्चित मानणाऱ्या उमेदवारालाच त्यांच्याच निकटवर्तीयांकडून फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या मतदान झाल्यानंतर सुज्ञ शिक्षक मतदार नेमका कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close