
संपादक – दिनेश खंडेलवाल
माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर – आमदार अभिजीत आबा पाटील
वाढदिवसासाठी जनतेचे प्रेम व शुभेच्छांचा होतोय वर्षाव
जाहिरात…. जाहिरात…. जाहिरात….
पंढरपूर(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याचे दमदार आमदार अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असून गेल्या ३० वर्षांमध्ये माढा तालुक्यातील जनतेच्या पाण्यांच्या प्रश्नाबरोबरच महत्त्वाचे विविध प्रश्नावर विधानभवनात आवाज उठवून पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे तरुण तडफदार आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे तरुण आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदार संघामध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
जाहिरात….. जाहिरात…. जाहिरात…..
लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १ ऑगस्ट रोजी माढा तालुका तसेच पंढरपूर तालुक्यामधून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. याचा लाभ संपूर्ण माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनता, वयोवृद्ध त्याचप्रमाणे महिला व लहान मुला, मुलींची आरोग्य तपासणी व विविध रोगावर उपचार केले जाणार आहेत.
जाहिरात….. जाहिरात…. जाहिरात…
यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. आमदार अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. माढा मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी व अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असून असा आमदार लाभणे हे आमचे भाग्यच आहे असे माढा मतदारसंघातून बोलले जाऊ लागले आहे.
जाहिरात….. जाहिरात…. जाहिरात….
जनतेचे प्रेम हेच त्यांच्या कामाची पावती असून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मान्यवर तरुण युवकांची साथ लाभली आहे. जनतेसाठी २४ तास काम करणारा हक्काचा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या ४२ व्या वाढदिवसासाठी जनतेचे प्रेम व शुभेच्छा मोठ्या प्रमाणात लाभत आहेत.
जाहिरात…. जाहिरात…. जाहिरात….