डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बहुजन समाज युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाबासाहेब क्षीरसागर
जयंती उपाध्यक्षपदी अमित पवार यांची निवड

संपादक – दिनेश खंडेलवाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बहुजन समाज युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी बाबासाहेब क्षीरसागर
![]()
जयंती उपाध्यक्षपदी अमित पवार यांची निवड
पंढरपूर(प्रतिनिधी):- विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ व्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर शहरात समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असून यावेळी स्टॅंडिंग शो चा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अभिजीत कांबळे व जयंती महोत्सवाचे अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

बहुजन समाज युवा प्रतिष्ठानचे वतिने जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत जयंतीच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष अमित पवार, सचिव बंटी कांबळे, खजिनदार नितीन कोलवार, कार्याध्यक्ष प्रेम खिलारे, आकाश माने यांची निवड संस्थापक अध्यक्ष अभिजीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते करण्यात आली.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स चप्पल लाईन येथे दरवर्षीप्रमाणे यांदाही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बहुजन समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर बैठकीवेळी बहुजन समाज युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ बापू खिलारे, सुदाम खिलारे, संतोष वाघमारे, दत्ता कांबळे यांच्यासह करण अण्णा सकट, सिताराम साठे, रोहित कांबळे, दादा रणदिवे, विकास आडगळे, राजेश दंडादे,सुमित खिलारे, मानव कांबळे, ओंकार कांबळे, सुशील खिलारे, समर्थ खिलारे, विश्वजीत मस्के, अक्षय माने, सोहम सकट, अण्णा सर्वगोड, अमित दादा वाघमारे, स्वागत कांबळे, नेहाल सकट, साईराज शेंडगे, लखन सर्वगोड आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

