सोलापूर पुणे हायवे वर कंटेनरची दुचाकीला धडक एक जागीच ठार एक जखमी
कृषी विज्ञान केंद्राच्या समोर घडला अपघात;भरधाव वेगातील कंटेनरची दुचाकीला धडक

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मोहोळ:राजेश शिंदे
सोलापूर पुणे नॅशनल हायवे वर मोटार सायकल आणि कंटेनरच्या अपघातात मोटर सायकलच्या मागे बसलेली एक महिला जागीच ठार तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मोहोळ शहराच्या हद्दीतील कृषी विज्ञान केंद्रा समोर घडली अपघातात मयत झालेल्या महिलेचे घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाचे दृश्य ह्रदय द्रावक होते.
भरधाव कंटेनरची धडक बसल्याने या अपघातात
कविता संजय माने (रा. डिकसळ ता. मोहोळ) ही महिला मृत झाली तर वैभव बाळासाहेब कदम (रा. तांबोळे ता. मोहोळ) असे मोटार सायकल वरील जखमी चालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वैभव कदम आणि कविता माने हे गुरुवार १६ डिसेंबर रोजी दुचाकीने यावली गावाकडून मोहोळ कडे येत होते. दुपारी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान त्यांची मोटार सायकल कृषी विज्ञान केंद्राच्या समोर आले असता भरधाव वेगातील के ए०१/ए इ ६१०९ या कंटेनरची पाठीमागुन धडक बसल्याने घडलेल्या भीषण अपघातात कंटेनर चे चाक अंगावर जाऊन कविता माने ही जागीच ठार झाली. तर वैभव कदम हा गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भयानक होता की कंटेनरच्या चाकात अडकल्यामुळे ४०० फुट फरफटत कविताचा मृतदेह नेल्याने तो छिन्न विछिन्न झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमी वैभव कदम यास उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून कविताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. या अपघातामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com