या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी – अनिल दादा सावंत
या मतदारसंघांमध्ये उच्च शिक्षण मोठे उद्योग उभारण्याचा संकल्प करण्यात आला
संपादक – दिनेश खंडेलवाल
या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी – अनिल दादा सावंत
या मतदारसंघांमध्ये उच्च शिक्षण मोठे उद्योग उभारण्याचा संकल्प करण्यात आला
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाची तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग व्यवसायाची गरज असून चांगल्या दर्जाचे शिक्षण चांगले उद्योग येथे आणून विस्तार करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत यांनी माचनुर येथील प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, सुधीर भोसले, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे, श्याम गोगाव यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांना जनतेंना मी एवढंच वचन देतो माझ्यावर विश्वास ठेवून शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे येथून विजय होऊनच साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आपण मला पाठवणार यात शंका नाही माझा कारखाना मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात मी चालवतो पंढरपूर मध्ये राहायला आहे या ठिकाणच्या अडीअडचणी जाणून घेतल्या असल्याने त्या सोडवण्यासाठी माझा प्राधान्याने प्रयत्न राहील.
या मतदारसंघाच्या काही भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे तर काही भागांमध्ये पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही अशी अवस्था या मतदार संघातील असून या मतदारसंघाचा विकास करण्याचे कार्य माझ्या हातून घडावे यासाठी येथील जनता मला विजयी करणार यात शंका नाही मी फक्त नावाचा उमेदवार असून या मतदारसंघाचे खरे उमेदवार हे शरदचंद्र पवार साहेबच आहेत फक्त राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी असून हा अनिल सावंत या मतदारसंघात विकास करून विजयी होऊन दाखवेल तरच अकलूज ची पायरी चढणार असा विश्वास देखील सर्व जनतेसमोर अनिल दादा सावंत यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना दिला.
या मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून फिरत असताना येथील मतदार चांगल्या प्रकारचा पाठिंबा देत असून मोठा प्रतिसाद लाभत आहे या मतदारसंघाच्या जनतेच्या पाठीशी आपण कायम राहणार आहे या मतदारसंघातील गुन्हेवा काढून विकास करू संतभूमी व देवभूमीत चांगले काम करण्याची संधी येथील जनता मला देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.