महाराष्ट्र राज्य मातंग समाज महीला आघाडी व युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी अनिल कसबे
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी केली नियुक्ती

संपादक-दिनेश खंडेलवाल
महाराष्ट्र राज्य मातंग समाज महीला आघाडी व युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी अनिल कसबे
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी केली नियुक्ती
पंढरपूर : राज्यातील मातंग समाज समन्वय समितीच्या महिला आघाडी व युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी अनिल कसबे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. या समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय बबनराव बोदडे आणि महासचीव विजय विश्वनाथ सोनोने यांनी नियुक्तीपत्र देऊन सदरची निवड जाहीर केली आहे.
पंढरीतील अनिल कसबे सध्या उध्दव ठाकरे शिवसेनेचे शहर कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी लहुजी शक्ती सेना तसेच भाजपा मध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मातंग समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते नेहमीच चळवळीत राहिले आहेत. शाहू , फुले, आंबेडकर आणि
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मातंग समाज समन्वय समितीने त्यांची महीला आघाडी व युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन कार्यकारणीवर निवड केली आहे. या आघाडीचे राज्याचे उपाध्यक्षपदी काम करण्यासाठी त्यांच्यावर समितीने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अनिल कसबे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर मातंग समाजातील पंढरपूर शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच मित्र परिवारांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट
भारतीय जनता पार्टी , लहुजी शक्ती सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आदी संघटनांमध्ये आपला ठसा उमटवलेल्या, अनिल कसबे यांची महाराष्ट्र राज्य मातंग समाज महीला आघाडी व युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीने पंढरपूर तालुक्यातील मातंग समाज बांधवांमध्ये नवचैतन्य पसरले आहे