राजकिय

ज्यांच्या मताने आपण खुर्चीवर बसला आज त्यांना वाऱ्यावर सोडले अनिल सावंत यांची आमदारांवर टिका

पंढरपूर तालुक्यात महाविकास आघाडीकडून अजून एक;धक्का लक्ष्मी टाकळी येथील देठे यांचा अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

ज्यांच्या मताने आपण खुर्चीवर बसला आज त्यांना वाऱ्यावर सोडले अनिल सावंत यांची आमदारांवर टिका

पंढरपूर तालुक्यात महाविकास आघाडीकडून अजून एक;धक्का लक्ष्मी टाकळी येथील देठे यांचा अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा

पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना गाव भेट दौरा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांनी तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावाला भेट दिली असता तेथील देठे परिवाराने त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांची मतदारसंघात ताकद वाढली आहे. यावेळी बोलताना अनिल दादा सावंत म्हणाली की विद्यमान आमदारांनी ज्या माणसांच्या, मतदारांच्या पाठीमागे लागून खुर्चीवर बसले त्याच माणसांना आपण वऱ्यावरती सोडले, ही परिस्थिती जर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची असेल तर आपल्या सारख्या सामान्य जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे काय होणार. या भागामध्ये विकास करत असताना एवढ्या कोटीचा निधी आणला तेवढ्या कोटीचा विकास निधी आणला अशा वलग्ना करणारे विद्यमान आमदारांनी खरंच या भागात विकास केला का..? असा सवाल केला. जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झालाय का नाही हे माझ्यापेक्षा आपल्या लोकांना अधिक तरुण पिढीला तुमच्यासारख्या समोर बसलेल्या मातांना भगिनींना चांगलं माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले.

पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे यामध्येच काल राष्ट्रवादी चे डॉ. अमोल कोल्हे यांनी पंढरपूर येथे उमेदवार अनिल सावंत यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊन सर्व गोष्टींचा खुलासा केला. आपला विरोधक फक्त आणि फक्त भाजप पक्ष आहे आणि विद्यमान आमदार आहेत.

अनिल सावंत यांनी पंढरपूर मधील गावांचा झंझावाती दौरा सुरु केला त्यातच लक्ष्मी टाकळी येथे अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात गतवेळी दोन वर्ष दोन्ही मतदारसंघांमध्ये पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या मतदारसंघांमध्ये गाव बैठक घेऊन प्रचार केला आणि निवडणुकी पुरती आश्वासने दिल्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना मतदान केले अशा भावना व्यक्त केल्या. पण त्यांनी काय केले..? असा सवाल हि मतदारांना संबोधित करताना नेत्यांनी केला. आधीच्या नेत्यांनी सगळ्यांचा विश्वास तोडला असे नमूद केले.

आज लक्ष्मी टाकळी येथे परमेश्वर लक्ष्मण देठे, माजी संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना. मा.संचालक पंढरपूर मार्केट कमिटी. महादेव मारुती देठे माझी संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना. मच्छिंद्र अर्जुन देठे प्रगतशील बागायतदार. रघुनाथ विठ्ठल देठे. हनुमंत शिवाजी देठे. मारुती सुखदेव रवळू. नाथा रमेश देठे. राजेंद्र रंगनाथ बागडे. बजरंग महादेव देठे. धर्मा गोवर्धन लवंड. विशाल बंडू देठे अधिक कार्यकर्त्यांनी अनिल दादा सावंत साहेब गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी लक्ष्मी टाकळी गावातील तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close