सामाजिक

आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

"रक्तदान करून द्या वाढदिवसाची भेट" केले आवाहन

संपादक-दिनेश खंडेलवाल

आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

“रक्तदान करून द्या वाढदिवसाची भेट” केले आवाहन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे यांचे 21 नोव्हेंबर 2022 रोजी वाढदिवस असल्याने यानिमित्ताने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या निमित्ताने वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी हार तुरे आणि पुष्पगुच्छ वगैरे खर्च न करता रक्तदान करून वाढदिवसाची भेट देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने आमदार समाधान दादा आवताडे यांनी वाढदिवसासाठी दरवर्षी मित्रपरिवारासह,पक्ष सहकारी,हितचिंतक, कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारी असे विविध माध्यमातून शुभेच्छा देतात तर काहीजण भेटवस्तू ,हार, तुरे, केक, होर्डिंग, बॅनर आदीच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात परंतु “संकल्प रक्तदानाचा मानव सेवेचा” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीने रक्तदानाचा संकल्प घेऊन उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान रुपी शुभेच्छा द्याव्यात व तेच आपल्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा असतील अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रिकेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

समाजाचे रुण फेडण्यासाठी संधी ही रक्तदानामुळे मिळते आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे अनमोल जीवन वाचू शकते यामुळे माणवसेवा या भावनेतून सर्वांनी मिळून जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदानाचा संकल्प सिद्धीस नेवा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close