अपक्ष उमेदवार विक्रांत आसबे यांना शेवटच्या टप्प्यात सुद्धा मतदारांचा वाढता पाठिंबा
प्रभाग १२ ब चे लाडके उमेदवार ठरत आहेत विक्रांत सज्जन आसबे

संपादक – दिनेश खंडेलवाल
अपक्ष उमेदवार विक्रांत आसबे यांना शेवटच्या टप्प्यात सुद्धा मतदारांचा वाढता पाठिंबा

प्रभाग १२ ब चे लाडके उमेदवार ठरत आहेत विक्रांत सज्जन आसबे

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील प्रचार शेवटच्या टप्यात असताना. प्रभाग क्रमांक १२ ब मधून अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून सध्या संपूर्ण प्रभागात हे उमेदवार सर्वांचे लाडके झाल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी होम टू होम प्रचारावर सुरुवातीपासून भर दिला होता. त्याचाच फायदा त्यांना उद्या होणाऱ्या मतदान रुपी आशीर्वादाने मिळणार आहे.

प्रभागात विविध प्रकारच्या प्रचारातून उमेदवारांकडून मतदान मिळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसतो. मात्र पंढरीतील प्रभाग क्रमांक १२ ब मधील अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे बद्दल लाडका भाऊची प्रतिमा झाल्यामुळे महिलांनी एकत्रित येत भक्कम पाठिंबा दर्शविला आहे.

विक्रांत सज्जन आसबे हे अपक्ष उमेदवार याच प्रभाग क्रमांक १२ ब मधील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांनी निवडणुकीत उतरण्यापूर्वीच या प्रभागातील विकासाचे व्हिजन तयार करून ठेवले होते. स्वतः उमेदवारी दाखल करण्याचा विचारही केला नव्हता. त्यावेळीही या प्रभागासाठी विकासाची दूरदृष्टी आणि याच भागातील उमेदवार मिळावा असे सुचविले होते. यामुळेच या प्रभागातील महिलांनी विक्रांत सज्जन आसबे यांच्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून प्रचारात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी एकजुटीने अपक्ष उमेदवारास आपल्या प्रभागातील हक्काचा लाडका भाऊसाठी म्हणून मोठे पाठबळ दिलं आहे.

या प्रभागात विकास कामे न करताही परत उमेदवारी मागणे कितपत योग्य आहे? आपण या प्रभागात मतदार नसताना स्थानिक उमेदवारावर अन्याय का?या सर्व प्रकारचा अभ्यास करून आपण या प्रभागातून अपक्ष उमेदवारी स्वीकारली आहे. अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक १२ ब चे अपक्ष उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांनी दिली आहे.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एकूण १८ प्रभागातून ३६ उमेदवारसाठी मतदान होत आहे. एकूण सर्वच प्रभागातील परिस्थिती पाहता प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये उमेदवार अधिक आहेत. त्यातही अपक्ष असणारे विक्रांत सज्जन आसबे यांचं अधिकच नशीब म्हणून की काय मतदान पत्रिकेत क्रमांक १ वर नाव आले आहे.

यामुळे अशिक्षित मतदार यांना भेटून प्रचारा दरम्यान त्यांना मतदान समजावून सांगत असताना सोपे झाले आहे. ही एक जमेची बाजू विक्रांत सज्जन आसबे यांच्यासाठी निर्माण झाली आहे.
![]()
त्यांनी प्रभागातील महिला वर्गासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि प्रभागात येणाऱ्या मंदिरा करता वेगवेगळे व्हीजन समोर ठेवल्याने सुशिक्षित मतदार हा ही त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. या मतदारांना विक्रांत सज्जन आसबे यांनी आपण आश्वासन देणार नसून काम करणारा उमेदवार आहे. थांबवून सांगितल्याने त्यांचा विश्वास प्रभाग क्रमांक १२ ब चे उमेदवार विक्रांत सज्जन आसबे यांच्यावर बसला आहे.

