सामाजिक

वृद्धांनी आपल्या शारीरिकते बरोबर मानसिकतेची काळजी घ्यावी- सौ.सुनेत्राताई पवार

राम कृष्ण हरी वृद्धाश्रम रुक्मिणी विद्यापीठाकडून दैनंदिन वस्तूचे वाटप

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विचारानी प्रेरित होऊन समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षण या ब्रीद वाक्याशी निगडीत राहून एक सामाजिक बांधिलकी म्हणून रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापीका सचिव सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीतील राम कृष्ण हरी वृद्धाश्रमात संस्थेचे संचालक मंडळ व महिला शिक्षकासह सदिच्छा भेट देऊन राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून दैनंदिन वस्तूंचे वाटप करण्यात

यावेळी बोलताना सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार म्हणाल्या की वृद्धाने आपल्या शारीरिकते बरोबर मानसिकतेची काळजी घ्यावी. नेहमी आनंदी राहवे. असे सांगून रोजचा आहार हलका व समतोल राखण्याचे आवाहन केले.

जयाताई टेकाळे यांनी राम कृष्ण हरी वृद्धाश्रमाची माहिती दिली. तर अशाताई गुजराती यांनी आश्रमातील दिनक्रम व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक काम पूर्ण करतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून याठिकाणी पुन्हा भेट देण्याचे ठरले.

या कार्यक्रमास प्राचार्य सौ नंदिनी गायकवाड व मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी भोसले यांचेसह संस्थेअंतर्गत च्या सर्व विभागातील शिक्षिका व महिला वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली कदम, सुवर्णा जगदाळे, जयश्री खडतरे, सुभद्रा सादिगले, सविता लोखंडे, राणी लाडे फरहाना कादरी कुमुदिनी सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले

शेवटी आश्रमातील महिलांनी रुक्मिणी विद्यापीठाच्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक दिनेश खंडेलवाल, पंढरपूर
mail -lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close