
संपादक – दिनेश खंडेलवाल
औसेकर दुग्धालय चे कृष्णा पाराजी औसेकर यांचे निधन
समस्त गवळी समाजातून होतेय हळहळ व्यक्त

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपुरातील लिंगायत गवळी समाजातील प्रतिष्ठित व पारंपारिक म्हैस पालन आणि दूध उत्पादन व्यवसायास नवी उंची, प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेले कृष्णा पाराजी औसेकर गवळी (वय ६४ ) यांचे बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले.
संत तनपुरे महाराज मठा शेजारील औसेकर दुग्धालयाचे मालक आप्पा औसेकर यांचे ते वडील होत. पारंपारिक पंढरपुरी म्हशीचे संगोपन आणि सर्वधन यासाठी त्यांचा देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कराने गौरव करण्यात आला होता.
तर नंद यशोदा मंदिर संस्थचे विश्वस्त म्हणून या संस्थेच्या उन्नतीसाठी तसेच गवळी समाजाच्या नियोजित मंगल कार्यालयासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

