राजकिय

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी माढा मतदारसंघातून उमेदवारी -प्रा. लक्ष्मण हाके

मतदारसंघात १३ लाख ओबीसी उमेदवार असतानाही संधी मिळत नाही

संपादक-दिनेश खंडेलवाल 

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी माढा मतदारसंघातून उमेदवारी -प्रा. लक्ष्मण हाके

मतदारसंघात १३ लाख ओबीसी उमेदवार असतानाही संधी मिळत नाही

पंढरपूर :- माढा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्ये पैकी १३ लाख मतदार हे ओबीसीचे आहेत. आणि या एवढ्या मोठ्या ओबीसी मतदार या मतदारसंघांमध्ये असताना देखील ओबीसी उमेदवाराला कधीही खासदारकीची संधी मिळालेली नाही. ओबीसी समाजाचा आवाज संसदेमध्ये उठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी या मतदारसंघातून लढणार आहे असे बहुजन पार्टीचे उमेदवार प्रा.लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अॅडव्होकेट प्रशांत रुपनवर, बाबा चव्हाण, सतीश कुलाल, सचिन बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की प्रस्थापित राजकीय मंडळींनी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी बांधवांना विविध आश्वासने देऊन झुलवत ठेवत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा हेतू साध्य केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील बागायत शेतकरी त्याचप्रमाणे जिरायत शेती करणारा शेतकरी, कष्टकरी कामगार आणि बेरोजगार तरुणांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही. सध्याचे खासदार हे मिनिटाला, तासाला हजारो कोटी रुपयेचा निधी आणला म्हणून सांगत फिरत आहे. परंतु या मतदारसंघांमध्ये कुठे विकास झालेला आहे हे त्यांनी दाखवून द्यावे. फक्त मतं मागण्या पुरते पाच वर्षातून यायचं आणि निवडून जायचे एवढेच कार्य त्यांनी केलेले आहे.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लोकशाहीच्या दरबारामध्ये मांडण्यासाठी मला एक वेळ जनतेने संधी द्यावी. या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. अशी ग्वाही उमेदवार प्रा.लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close