भाळवणीत प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तडजोडीने निकाली!
तडजोड करणे हाच सर्वसमावेशक न्याय- न्या. कुंभार
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : वादी प्रतिवादींनी आपला दावा जर सामोपचाराने तडजोड करून दावा निकालात काढल्यास तो निकाल सर्वसमावेशक असतो असे मत चौथे दिवाणी न्यायाधीश आर जी कुंभार यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शाकंभरी देवी सभा मंडपात भाळवणी ग्रामपंचायत व मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या आदेशान्वये पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यात न्याय आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत मोबाईल व्हॅन मधून फिरते लोक अदालत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्या. कुंभार म्हणाल्या की न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बँकेचे, विद्युत महामंडळ, इतर दाखल पूर्व प्रकरणे या लोक अदालत मध्ये तडजोडीने निकाली काढता येतात याचा सर्वसामान्य जनतेने, नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. याकरिताच लोक अदालत आयोजन करण्यात येत आहे. यावेळी ऍड.देशमुख,ॲड मेंडिगीरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश ए आर जाधव ,विधी सेवा समितीचे अध्यक्ष भगवान मुळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष पिव्हील मेंबर ॲड.अंकुश वाघमारे,आझाद अल्लापूकर,विधी सेवा समिती सदस्य नंदकुमार देशपांडे,सरपंच राजकुमार पाटील,शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख शिवाजी बाबर,भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस लुकमान इनामदार,उद्योजक विजय शिंदे,नितीन शिंदे,आनंद देशपांडे,प्रशांत माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विशाल ढोबळे यांनी केले होते. तर सूत्रसंचालन ॲड सरवळे यांनी केले तर आभार ॲड गोसावी यांनी मानले. यावेळी अधीक्षक व न्यायलिन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तडजोड करणे हाच सर्वसमावेशक न्याय- न्या. कुंभार