ईतरराज्य

सोलापूर जिल्ह्यातील अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;निधीची पूर्तता होणार, भरपाई मिळणार 

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सोलापूर जिल्ह्यातील अवकाळीने बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;निधीची पूर्तता होणार, भरपाई मिळणार 

पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्याचा निधी अद्यापही मिळाला नसल्याने शेतकरी प्रत्येक वेळी मागणी करत होते परंतु सरकारने आता हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सोलापूर जिल्ह्यातील अवकाळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

माढा मतदारसंघातील विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दि. १६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी राज्य शासनाने रु. ४४९.०६ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

हा निधी २७४८ बाधित शेतकऱ्यांच्या १९७६.६७ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आला असून, लाभार्थ्यांच्या थेट खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. या निर्णयामागे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासन दरबारी प्रभावी मागणी महत्त्वाची ठरली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त आणि महसूल विभागाकडे पाठपुरावा करून प्रशासनाच्या लक्षात ही गरज आणून दिली.

या निधीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेश आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close