सामाजिक

बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा पंढरपुरात या समाजाकडून निषेध

गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची केली मागणी

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर :- महाराष्ट्रातील नांदेड येथे काही दिवसापूर्वी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व माहेश्वरी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांचे काही समाजकंटकांनी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती त्यांच्या मारेकऱ्यांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करून या घटनेचा निषेध पंढरपुरातील माहेश्वरी सभा व राजस्थानी मंडळ तसेच राजस्थानी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.

नांदेड सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडू लागल्याने माहेश्वरी समाजात चिंतेचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहेश्‍वरी समाजातील बांधकाम व्यवसायिक असलेले संजय बियाणी यांना सामाजिक कार्याची आवड होती. यासाठी त्यांनी
नुकतेच हत्येच्या १० दिवसा पूर्वी माहेश्वरी समाजातील ज्या ७३ जणांना स्वतःची घरे नाहीत अशा परिवारांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्वताच्या हक्काची घरे बांधून देण्याचे अलौकीक कार्य त्यांनी केले होते. तसेच कोरोना काळात देखील त्यांनी हातावर पोट असणाऱ्या हजारो लोकांसाठी मोठी सेवा केली होती. हजारो लोकांनाचा उदर निर्वाह त्यांचा वर अवलंबून होता.

अशा बांधकाम व्यावसायिकावर दिवसा ढवळ्या हल्ला झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजात नैराश्य,भिती,व अवस्थता पसरली आहे. नांदेड सारख्या शहरात बांधकाम व्यवसायिक व समाजसेवकांची उघडपणे झालेली हत्या निंदनीय व चिंतेची बाब असून या समाजाचे शिस्तबद्ध व देशाची जीडीपी मध्ये मोठे योगदान आहे. अशा समाजावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जात असल्याच्या घटनेने समाजबांधव नैराश्यात वावरत आहेत.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून सदर घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच दोषींना अटक करून कठोरात कठोर कारवाई करून संजय बियाणी कुटुंबाला व समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी पंढरपूरचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांच्याकडे माहेश्वरी सभा व राजस्थानी मंडळाचे पदाधिकारी,सदस्य व समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक: दिनेश खंडेलवाल
mail -lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close