स्व. डॉक्टर संदीप मर्दा यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर
शहर व तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन

संपादक-दिनेश खंडेलवाल
स्व. डॉक्टर संदीप मर्दा यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर
शहर व तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन
पंढरपूर : पंढरपूर शहरात अल्पावधीत ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला ते दिवंगत अस्थिरोग तज्ञ स्व. डॉक्टर संदीप सुभाष मार्दा यांच्या प्रथम स्मृती पित्यर्थ पंढरपूर ब्लड सेंटर येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मर्दा परिवार आणि पंढरपूर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले असून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असल्याने शहर व तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करावे. आपल्या एका रक्ताच्या पिशवीमुळे कोणाचातरी जीव वाचणार असून कोणालातरी जीवदान मिळणार आहे. हा विचार करूनच या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिवंगत डॉक्टर संदीप सुभाष मर्दा यांचे वडील सुभाष मार्दा यांनी दिली.
समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि सामाजिक भान ठेवून मर्दा परिवाराने ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या घोषवाक्यास अनुसरून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सदरचे शिबिर हे पंढरपूर ब्लड बँक सेंटर, उमा कॉलेज जवळ, कराड नाका येथे रविवार दिनांक १७ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत होणार असून या रक्तदान शिबिरामध्ये पंढरपूर आणि परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. असे आवाहन पंढरपूर ब्लड बँक सेंटर आणि मर्दा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.