मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू
युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्याकडून ५लाख १हजार रू. मदतीचा हात
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मंगळवेढा : मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम छत्रपती बहुउद्देशीय संस्थाने सुरू केले आहे. पुतळ्याचे कामकाज सुरू असल्याने पंढरपूर-मंगळवेढ्याचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांन ५ लाख १हजार रू. बहुउद्देशीय संस्थेला देऊन खारीचा वाटा उचलला आहे.
मंगळवेढा हि संताची, ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव मंगळवेढा नगरीत होते. महाराजांचे आचार-विचार जनमानसात व येणाऱ्या पिढीसमोर रूजून ऊर्जेचा स्रोत सतत डोळ्यासमोर राहावे. शिवजन्मोत्सव समितीने सह्याची मोहीम राबवत त्यास मंगळवेढेकरांनी उत्सुद प्रतिसाद दिल्याबद्दल त्याचं मनापासून आभार अभिजीत पाटील यांनी मानले.
यावेळी मंगळवेढा नगराध्यक्ष श्री.सोमनाथ माळी, उपनगराध्यक्ष श्री. चंद्रकांत घुले, नगरसेवक श्री.अजित जगताप, सभापती श्री. प्रवीण खवतोडे, श्री. राहूल सवंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. माऊली कौंडभैरी, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री. अभिजीत कदम, श्री.अशोक डोरले, श्री.संभाजी घुले, श्री.अनिल मुदकूल आदी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com