“हाती हात धरू संकल्प विजयाचा करु” काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघात संकल्प सभा
संत तनपुरे महाराज मठात होणार मार्गदर्शन शिबिर

संपादक-दिनेश खंडेलवाल
“हाती हात धरू संकल्प विजयाचा करु” काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघात संकल्प सभा
संत तनपुरे महाराज मठात होणार मार्गदर्शन शिबिर
पंढरपूर : सोलापूर शहर – जिल्हा कॉंग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने “हाती हात धरू संकल्प विजयाचा करू” म्हणत काँग्रेस आय पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये संकल्प सभा आणि शोध पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे.
आज मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी पंढरपूर शहर व तालुक्यासाठी संत तनपुरे महाराज मठा मध्ये दुपारी २ वाजता सोलापूर शहर – जिल्हा कॉंग्रेस कमिटी व इंडिया आघाडीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर लोकसभेच्या संभाव्य उमेदवार तथा आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि इंडिया आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत “हाती हात धरू संकल्प विजयाचा करू” या संकल्प सभा व अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे, भारतीय लोकशाही आणि राज्यघटना या विषयावर प्रख्यात पत्रकार निरंजन टकले मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या धाडशी, परखड, प्रवाहाच्या विरुद्ध हुकूमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी केले आहे.
संकल्प सभा आणि मार्गदर्शन शिबिरासाठी कॉंग्रेस व इंडिया आघाडीचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे , शिवसेना (उठाबा) जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते अभिजीत आबा पाटील सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक, नगरसेविका, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, आघाडी प्रेमी, सर्व नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ प्रकाशतात्या पाटील, महिला नेत्या सुनेत्रा पवार, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार व पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी पंढरपूर मंगळवेढा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष बाळासाहेब आसबे या सर्वांनी केले आहे.