क्रेडाई पंढरपूरच्या वतीने १९ ते २१ जानेवारी रोजी “गृह उत्सव २०२४” चे आयोजन
गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार

संपादक-दिनेश खंडेलवाल
क्रेडाई पंढरपूरच्या वतीने १९ ते २१ जानेवारी रोजी “गृह उत्सव २०२४” चे आयोजन
गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार
पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरांमध्ये आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच घराचे बांधकाम करण्यासाठी आणि विविध प्रकारांची माहिती आता ‘”गृह उत्सव २०२४”‘ मध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे व ती संधी उपलब्ध करून दिली आहे पंढरपूरच्या क्रेडाई संस्थेने.
क्रेडाई पढरपूर या संस्थेच्या वतीने पढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक १९ ते २१ जानेवारी २०२४ दरम्यान ‘”गृह उत्सव २०२४”‘ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प, फ्लॅट्स, रो हाऊस, ओपन प्लॉट्स यांची माहिती ही एकूण ८० स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई, सिमेंट, रंग, सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरने प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे.
याशिवाय प्रदर्शनामध्ये १० फूड स्टॉलचा समावेश असून प्रदर्शन विनामूल्य राहणार आहे. पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. गृह उत्सव २०२४ साठी मुख्य प्रायोजक कालिका स्टील व सहप्रायोजक कायनेटिक लिफ्ट, विनायक सीरॅमिक्स, बैंकिंग पार्टनर एचडीएफसी लि. तसेच केबीआर पंप, सुप्रीम पाईप्स, नेरोलॅक पेट, उमा स्टील ह्या सर्व प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.
पंढरपूर शहर व तालुका परिसरातील नागरिकांनी आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी या गृह उत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगांवकर, उपाध्यक्ष आशिष शहा, सचिव मिलिंद देशपांडे, सहसचिव शशिकांत सुतार, खजिनदार संतोष कचरे, जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी यांनी केले आहे. प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी क्रेडाई पंढरपूर तर्फे आकर्षक बक्षिसे व स्कीम मध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक सूट ही देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.