ईतर

सावधान:”ती परत आलीय” एस टी बंद असल्याने केली मदत आणि घडले भलतेच;वाचा काय प्रकार आहे

माणुसकीच्या भावनेतून केलेले सहकार्य आले अंगलट;अन् झाला रिकामा

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

अहमदनगर : आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनातून जात असताना रस्त्याने जर कोणी लिफ्ट मागितली तर संबंधित व्यक्ती माणुसकीच्या भावनेने समोरच्या व्यक्तीला मदत म्हणून लिफ्ट देतो. परंतु काल एका कार चालकास अशीच माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत चांगलीच महागात पडल्याचा अनुभव आला.

रस्त्यावर उभा राहून ती वाहनचालकांना लिफ्ट मागायची निर्जनस्थळ येताच वाहन थांबायला सांगायचे आणि मग थेट चालकाकडे पैशांची मागणी करायची पैसे देण्यास नकार दिला तर आरडाओरड करून गुन्हा दाखल करायची धमकी द्यायची.
आणि वाहन चालका जवळ असतील तेवढे पैसे घेऊन पळ काढायचा आशा प्रकरणात सराईत असलेली एक महिला पुन्हा सक्रिय झाली असुन काल दुपारच्या सुमारास नगर जामखेड महामार्गावर चांदणी चौक ते टाकळी काझी दरम्यान एका खाजगी वाहनचालकास रस्त्यावर ‘ती परत आलीय’ ची प्रचीती आली अन् मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार घडला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि काल दुपारच्या सुमारास नगरहुन जामखेड कडे जात असलेले खाजगी वाहन चालक चांदणी चौकात आले असता चौकात उभे असलेल्या दोन महाविद्यालयीन युवक आणि एका महिलेस एस टी बस बंद असल्याने त्यांना माणुसकीच्या भावनेतुन मदत करण्याच्या उद्देशाने चालकांने त्यांना गाडीत बसवले.

महाविद्यालयाचे विद्यार्थी सारोळ्यात व महिला टाकळीस उतरणार असल्याचे सांगितले. त्या प्रमाणे महाविद्यालयाचे ते दोन युवक सारोळ्याला उतरले व महिलेने टाकळी कडे जाताना टाकळीच्या माथ्यावर गाडी थांबवायला सांगितली. आपल्या पर्स मधुन पाचशे रुपये काढून तुमचे गाडीचे भाडे घ्या म्हणुन हुज्जत घालु लागली.

वाहन चालकाने पैसे घेण्यास नकार देत मी कुणाचे ही पैसे घेत नाही. बस बंद असल्याने मी माणुसकीच्या नात्याने आपणास येथे सोडण्यास तयार झालो असे सांगितले. परंतु ती महिला काही ऐकेना उलट कायद्याची भाषा करू लागली.

ती म्हणाली मी तहसील कार्यालयात नोकरीस असून आमच्या मॅडमना बोलावून तुमच्यावर कारवाई करणेस सांगेण अशी धमकी देत तुमच्या कडे किती पैसे आहेत ते द्या अशी मागणी करत त्याचाकडील रोख रक्कम घेऊन तेथुन पसार झाली. अनपेक्षीत झाल्या प्रकाराने वाहन चालक ही मुकाट्याने पश्चाताप करत मार्गस्थ झाला.

या घटनेने इतर वाहनचालकांनी बोध घ्यावा व नगर जामखेड मार्गावर जर रस्त्यामध्ये कोणी महिला लिफ्ट मागत असेल तर तिला लिफ्ट देताना दहा वेळा या घटनेचा विचार करावा कारण ‘ती परत आलीय’ याची प्रचिती तुम्हाला ही येऊ शकते.

बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close