राजकिय

पोटनिवडणुकीत समीर शेख यांचा दणदणीत विजय देगावकर जनतेचा कल सरपंच गटाच्या बाजूने

अभिजीत पाटलांनी केला कार्यकारिणीचा सत्कार

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल विद्यमान सरपंच सौ.सीमा संजय घाडगे व त्यांच्या आघाडीच्या बाजूने लागला आहे. संध्यावळी ग्रामविकास आघाडीचे सर्वपक्षीय उमेदवार समीर महंमदहुसेन शेख यांचा ७५ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. याबाबत पंढरपूरचे उद्योजक व युवा नेते अभिजित धनंजय पाटील (आबा)यांच्या हस्ते काल विजयी सदस्य व ग्रामपंचायत कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात विविध उपाययोजना व वेगवान लसीकरणासाठी सक्रिय ग्रामपंचायत म्हणून संपूर्ण जिल्ह्यात देगाव ग्रामपंचायतीला गत वर्षभरात मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे.

युवा सरपंच व त्यांच्या टीमने अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा सपाटा लावला आहे. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकच उमेदवार दोन ठिकाणी निवडून आल्याने एका जागेचा विजयी उमेदवारास राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पोटनिवडणूक २१ डिसेंबर रोजी मंगळवारी पार पडली होती. सध्या या ग्रामपंचायतीवर भालके गट,परिचारक गट, अभिजीत पाटील गट आणि आ. बबन दादा शिंदे व स्थानिक गटाची संयुक्त सत्ता आहे.

यावेळी भालके गट,परिचारक गट, अभिजीत पाटील गट व आ. बबन दादा शिंदे गट व स्थानिक आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून समीर महंमदहुसेन शेख यांची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्या विरोधात स्थानिक आघाडीकडून उमेदवार म्हणून दत्तात्रय गणपत बनगोसावी यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत चालू दहा महिन्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावर सरपंच व त्यांच्या कार्यकारनीने जोरदार प्रचार करत विजश्री खेचून आणली आहे. याबाबत तालुक्याचे युवा नेते व पार्टी प्रमुख अभिजीत धनंजय पाटील यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close