ईतर

दोडला डेअरीकडून दूध दरात फसवणूक! शेतकरी आक्रमक

महेश साठे करणार दूध डेअरीच्या चौकशीची मागणी;भेसळयुक्त दूधाची वर्तवली शक्यता

संपादक-दिनेश खंडेलवाल

दोडला डेअरीकडून दूध दरात फसवणूक! शेतकरी आक्रमक

महेश साठे करणार दूध डेअरीच्या चौकशीची मागणी;भेसळयुक्त दूधाची वर्तवली शक्यता

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील आढीव परिसरातील पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यावरील दोडला दूध डेअरीकडून तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची शासनाच्या दूध अनुदानामध्ये फसवणूक झाली असून प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रती लिटर आठ रुपयाचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांची लूट सुरू असून, याप्रकरणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी परिसरातील सुमारे ५०० शेतकऱ्यांनी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, सरपंच संजय साठे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी येथील दोडला डेअरीमध्ये जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत विचारणा करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी बाबर व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले. अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी दूध संघाने २६ जानेवारी २०२४ पर्यंत अपलोड करावयाची होती. परंतु या दूध संघाकडून ही यादी २७ जानेवारी रोजी सबमिट करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. याचवेळी अनुदान जाहीर होताच, या दूध संघाकडून दुधासाठी शासन अनुदान हवे असल्यास दुधाचा दर ३० रुपयांवरून २७ रुपये करावा लागेल. ३० रुपये दर दिल्यावर संबंधित दूध उत्पादक शेतकरी अनुदानास पात्र ठरत नाही अशी शेतकऱ्यांच्या मनात भीती घालण्यात आली. गेल्या चार महिन्यांपासून याच दराने दूध घेतले जात आहे. अनुदानही नाही, आणि दूध दरही कमी यामुळे, या शेतकऱ्यांची लूट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शनिवारी सकाळी हे शेतकरी या दूध संघासमोर
जमले. या ठिकाणी व्यवस्थापकाबरोबर दूध दर आणि अनुदान यावरून शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. यानंतर एक दिवसाची मुदत या व्यवस्थापनाने उपस्थित जमावास मागून घेतली.

दोडला हा खाजगी दूध संघ आंध्र प्रदेशमधील असून , दूध संकलन क्षेत्रात याचे मोठे नाव आहे. गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे प्रती लिटर ८ रुपयाचे नुकसान या दूध संघाकडून झाले आहे. दूध संघाच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या धमकीवरून त्यांची भांडवलशाही वृत्ती दिसून आली आहे. दूध दरावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर दोडला कंपनी वेठीस धरत असेल तर पंढरपुरातच काय महाराष्ट्रात या कंपन्या चालू देणार नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे अनुदान न मिळाल्यास यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू असा इशाराही महेश साठे यांनी दिला.

दूध भेसळीचाही आरोप—-

दरम्यान सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दूध संघात
भेसळ होत असल्याचा आरोप केला आहे. दूध संकलन कमी होत असतानाही दररोज २५ हजार लिटर दूध हैदराबादला पाठवले जाते. केमिकलचे दूध मिक्स करतात काय? असा प्रश्न उपस्थित करत दुधासारख्या अमृताच्या आडून विष पाजणारी जर ही वृत्ती असेल तर यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close