सामाजिक

दिलीप स्वामी यांच्या सहकार्याने अंगणवाडीतील त्या बालिकेची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न;काय होती ती शस्त्रक्रिया पहा

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात मानले आभार

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावच्या एका अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या अडीच वर्षाच्या इनाया मतीन बागवान या बालिकेची ऐकण्याची क्षमता कमी होती. त्या बालिकेच्या कानाची ‘कोक्लेयर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करायची होती. मात्र अतिशय महागडी शस्त्रक्रिया व सुमारे सहा लाख खर्च अपेक्षित असल्याने तीच्या पालकांची परिस्थिती पाहता त्यांना शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सदर बालिकेची तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करून त्या बालिकेची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली.

दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी त्या बालिकेला शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या मोरया हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले त्या ठिकाणी तीच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्या अडीच वर्षाच्या इनाया मतीन बागवान या बालिकेस एक प्रकारे दुसरा कान मिळाल्याचा आनंद तीच्या पालकांना झाला. आपली मुलगी सुखरूप बरी झाल्याने त्या बालिकेचे आई-वडील हे गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये आले त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या मुलीची आई म्हणाली की साहब आपके वजह से मेरी बच्ची सलामत है इन्शा अल्लाह आपके बच्ची की उम्र बडी करे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थितही भाऊक झाले होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ढेले, डॉक्टर शीतलकुमार जाधव, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम समन्वयक ऍड भगवान भुसारी,डॉ अनिरुद्ध पिंपळे यांची उपस्थिती होती.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जवळपास १ हजारच्या आसपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात ४४ ह्रदयाच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता अशी माहिती देण्यात आली.

काय आहे कोक्लेयर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया

आपल्या कानाच्या आतील बाजूस कोचलीया नामक केसांच्या लहान पेशी असतात. या पेशी सामान्यत: बाहेरून येणारे ध्वनी स्पंदने उचलतात आणि श्रवण मज्जातंतूंद्वारे मेंदूत पाठवतात. त्यामुळे कमी ऐकू येणाऱ्या लोकांना आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते. कोक्लेयर इम्प्लांट हे एक लहान आणि जटिल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. एका विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ऐकण्याची क्षमता वाढते.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close