गौतमी पाटील “घुंगरू” चित्रपटातून लवकरच येणार प्रेक्षक चहात्यांच्या भेटीला
साकडे पूर्ण करण्यासाठी पटकथा,लेखक,दिग्दर्शक, निर्माता बाबा गायकवाड पंढरीत

संपादक-दिनेश खंडेलवाल
गौतमी पाटील “घुंगरू” चित्रपटातून लवकरच येणार प्रेक्षक चहात्यांच्या भेटीला
साकडे पूर्ण करण्यासाठी पटकथा,लेखक,दिग्दर्शक, निर्माता बाबा गायकवाड पंढरीत
पंढरपूर : महाराष्ट्रभर आपल्या अदाकारीने तरुणांच्या ह्रुदयात स्थान निर्माण करणारी गौतमी पाटील लवकरच “घुंगरू एक संघर्ष” या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या नृत्याच्या अदाकारीने गौतमीने जनतेच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. लावणी क्वीन असणारी गौतमी आता लवकरच मोठ्या पडद्यावर घुंगरू एक संघर्ष चित्रपटातून झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘घुंगरू‘ चा टिझर लॉन्च झाला. लोककलावंताच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटांमध्ये रहस्यमय कथा, लव्ह स्टोरी आणि जीवनाचे संघर्ष या विषयावर असुन प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल
“घुंगरू” चे पटकथा, लेखक, निर्माता व दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी केले असून नवीन कलाकारांना त्यांनी संधी दिली आहे. मात्र प्रेक्षकांना खुर्चीला शेवटपर्यंत बांधून ठेवणारा हा चित्रपट असेल चित्रपट सुरू करण्यापूर्वी विठ्ठलाला आपण साकडे घातले होते ते पूर्ण करण्यासाठी आज पंढरपुरात विठ्ठल चरणी आले असता घुंगरू एक संघर्ष या चित्रपटाविषयी माहिती दिली.
“घुंगरू” हा चित्रपट शेवटच्या टप्प्यात असून पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात पहावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चित्रपट लोक कलावंताच्या जीवनातील संघर्षावर असून यामध्ये विविध पैलू लपलेले आहेत ते आपण प्रत्यक्ष चित्रपटगृहात पहा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच ‘घुंगरू‘ चा टिझर लॉन्च झाला. या चित्रपटात गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका आहे. हा गौतमीचा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्यासह तिच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे.