हिंदु जागृत न झाल्यास येत्या ५० वर्षात भारताचे रुपांतर इस्लामी देशामधे होण्याची शक्यता – स्वामी असिमानंद
पंढरपुरातील वनवासी आश्रमला स्वामी असिमानंद यांनी दिली भेट

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : सध्या भारतामधे २० टक्के हुन अधिक मुस्लीमांची संख्या झाली आहे. येत्या १० ते १५ वर्षांमधे मुस्लिम हे वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील किंवा भारताचे रुपांतर इस्लामी राष्ट्रात होइल- असे उदगार स्वामी असिमानंद यांनी काढले.
ते पंढरपूरात वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यक्रमामधे बोलत होते. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे सुरेश कुलकर्णी, शहर सचिव विकास वाघ, स्वा. सावरकर प्रेमी मंडळाचे अशोक माळी, शिरीष पारसवार, रा. स्व. संघाचे शहर प्रमुख विठ्ठल मिरासदार, सारंग बडोदकर, भिंगे गुरुजी,सुरेंद्र कवठेकर, आनंद नगरकर, हिंदुमहासभेचे अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे, विश्व हिंदु परिषदेचे साळी सर,अर्बन बँकेच्या संचालीका मेघा दाते, याचेसह हिंदुमहासभा, रास्व संघ, वनवासी कल्याण आश्रम, स्वा. सावरकर प्रेमी मंडळ, बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सध्या पश्चिम बंगालमधे इस्लामीक प्रयोग यशस्वी होताना दिसुन येत आहे. केवळ ३० टक्के मतांच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळविला आहे. सध्या तेथे हिंदु जनमाणसांची ससेहोलपट सुरु आहे. ममता बॅनर्जी यांचे मागे भारतातील सर्व मुस्लीमांना उभे करावयाचे आणि सन २०२९ साली मुस्लिमांना हवा तो पंतप्रधान करावयाचा. असे षडयंत्र रचले जात आहे. याबाबत हिंदु समाजाने जागृत होणे गरजेचे आहे.जगातील सर्व देशांना मुस्लिमांचा धोका आहे. लंडन शहरामधे केवळ १५ टक्के मुस्लिमांची संख्या असतानाही तेथे महापौर मुस्लिम आहे. भविष्यात ज्या देशांमधे मुस्लिमांची संंख्या कमी आहे. तेेथे ती वाढवून मुस्लिम राष्ट्र बनवायचे. असे षडयंंत्र आंतरराष्ट्रिय स्तरावर रचले जात आहे. याबाबत सध्या सर्व जगामधे मंथन सुरु आहे.
भारतातील आदिवासी वनवासी भागामधे ख्रिश्चनीकरणाची लाट आणली जात आहे. गरीब आणि अशिक्षीत वनवासी बांधवांना फसवून ख्रिश्चन केले जात आहे. वनवासी कल्याण आश्रम हे प्रकार थांबविणेचा प्रयत्न करत आहे. याचबरोबर जे बांधव या अगोदर ख्रिश्चन झाले आहेत त्यांना परत आपल्या धर्मात घेतले जात आहे. यामुळेच काँग्रेसी सरकारने आम्हाला तुरुंगात डांबुन आमचे काम थांबविणेचा प्रयत्न केला. पण आम्ही घाबरणार नाही. खोट्या खटल्यातुन आम्ही सुखरुप बाहेर पडलो. आता पुन्हा हे काम जोमाने करणार आहोत. असेही स्वामी असिमानंद यांनी यावेळी सांगून ते पुढे म्हणाले की, सन २०१४ पासुन हिंदु समाज जागृत होत आहे. ही समाधानाची बाब आहे. जर हिंदु जागृत झाला तरच आपण हिंदु म्हणुन राहु. असेही त्यांनीं प्रतिपादन केले.
यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य सांगुन स्वामी असिमानंद यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांना काँग्रेसी सरकार द्वारा देण्यात आलेल्या यातनांचे वर्णनही त्यांनी यावेळी केले. शेवटी संपुर्ण वंदेमातरम होउन कार्यक्रमाची सांगता झाली.
[चौकटः- स्वामी असितानंद यांचा हा पंढरपूरचा पहिलाच दौरा होता. त्यांनी यावेळी जास्तीत जास्त हिंदुत्वनिष्ठ संस्था, नेते, कार्यकर्ते यांची भेट घेण्याचा प्रयत्न करुन चळवळ पुढे नेण्याविषई चर्चा केल्या. ६ डिसेंबर हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असलेने कार्यक्रमाचे सुरवातीलाच महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.]
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com