ईतर

पंढरीत जागतिक स्तनपान सप्ताह संपन्न

माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत पालकांना मुदत ठेव सपूर्द

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरीत जागतिक स्तनपान सप्ताह संपन्न

माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत पालकांना मुदत ठेव सपूर्द

पंढरपूर :- एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताह समारोप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थितांना विविध कार्यक्रमाची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. संगीता पाटील, डॉ. सीमा राका, डॉ. दिपाली बेणारे, प्रकल्प अधिकारी सौ. वर्षा पाटील मॅडम तसेच मुख्य सेविका सौ. सारिका सनगर मॅडम व सौ. सविता जगताप मॅडम या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी योजना गीतांनी करण्यात आली अंगणवाडी मुख्य सेविका सौ. सारिका सनगर मॅडम यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाच्या माध्यमातून कोण- कोणत्या योजना राबविल्या जातात याबाबत माहिती विशद केली. यावेळी बोलताना डॉक्टर संगीता पाटील म्हणाल्या की महिलांनी बाळाला प्रथम आईचे दूध देणे आरोग्याच्या हिताचे असते. प्रत्येक स्त्रीने मनाने न खचता आरोग्याची काळजी घेत स्वतः निरोगी राहणे आवश्यक आहे. आहार आणि आरोग्य व्यवस्थित असेल तरच सुदृढ बाळ जन्मास येईल. स्तनदा माता ने बाळाला स्तनपान कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉक्टर दिपाली देणारे यांनी गर्भावस्थेतच बाळाला गर्भसंस्कार करणे का आवश्यक आहे याबाबत माहिती दिली. अगदी प्रत्येक स्त्री गर्भावस्थेत आपली व बाळाची काळजी कशी घेऊ शकते, त्याचबरोबर स्तनपानांचे फायदे व स्तनपान न केल्यास होणारे नुकसान याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ. धनश्री डफळे मॅडम यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका सौ. अरुणा बुट्टे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

यावेळी प्रकल्प अधिकारी सौ वर्षा पाटील मॅडम व मुख्य सेविका सौ.सारिका सनगर मॅडम व सौ. सविता जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पंढरपुरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या उपस्थितीत जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close