ईतर

जालना येथील घटनेचा पंढरीत निषेध;पंढरपूर शहरात बंद यशस्वी

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त;तहसीलदारांना दिले निवेदन

संपादक-दिनेश खंडेलवाल

जालना येथील घटनेचा पंढरीत निषेध;पंढरपूर शहरात बंद यशस्वी

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त;तहसीलदारांना दिले निवेदन

पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मराठा समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देत आज कडकडीत पंढरपूर बंद यशस्वी झाला. त्याचबरोबर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधव व इतर समाजांनी पाठिंबा दिल्यानंतर सर्वांच्या वतीने जालना येथील घटनेचा निषेध करीत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणार्थि वर पोलिसांकडून झालेला लाठी चार्जच्या घटनेचा जाहीर निषेध करत काल आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठीय्या आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजातील आंदोलकांवर झालेली लाठीचार्ज आणि गोळीबाराचा निषेध करून रविवार दि.३ सप्टेंबर रोजी पंढरपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजीत पाटील, कोळी समाजाचे अध्यक्ष अरुण कोळी, विनोद लटके, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शशिकांत पाटील, काँग्रेस पक्षाचे शंकर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी निष्पाप आंदोलकांवर लाठीचार्ज, गोळीबार करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करत घोषणा देण्यात आल्या. दरम्यान मंदिर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली.
या बंदला पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व विविध समाजातील नागरिकांनी पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे असूनही लाठीचार्ज, गोळीबार केला जातो, यामुळे सरकारवर तीव्र शब्दात टीका आंदोलक करीत होते.

जालना येथील घटनेचा निषेध करत शहरातील सर्व दुकानदार , व्यावसायिकांनी उस्फुर्ततेने कडकडीत बंद पाळला होता.
लोकशाही मूल्यांचे पालन करीत आंदोलन करीत असणाऱ्या मराठा लोकांवर अमानुष मारहाण करण्यात आली, याचा जाब विचारत विविध घोषणा देण्यात आल्या.
या घटनेचे निवेदन घेण्यासाठी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर पंढरपूर पोलिस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जून भोसले, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी रोहिणी बनकर व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने जालना जिल्ह्यातील घटनेच्या जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले. पंढरपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

चौकट…..
[छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करीत असताना आंदोलकांनी पंढरपूर येथे दि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या “शसान आपल्या दारी” हा समारोपाचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरीत आल्यास त्यांना या घटनेचा जाब विचारला जाईल असे बोलले जात होते.]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close