सामाजिक

समाजसेवक संजय बाबांची दबंग कामगिरी;स्वखर्चाने बसवले पाच सीसीटीवी कॅमेरे

सीसीटीवी मुळे पेट्रोल चोरावर बसणार आळा

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये समाज कार्यात अग्रेसर असणारे व कोविड योद्धा म्हणून परिचित असलेले सामाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी दबंग कामगिरी करत आपल्या परिसरामध्ये स्वखर्चाने पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्या परिसरामध्ये समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे स्वतःचे घर असून त्यांचे स्वतःचे घर यापूर्वी तीन वेळा चोरट्यांनी फोडले होते. त्याचबरोबर सध्याच्या महागाईच्या दिवसामध्ये या परिसरातील दुचाकी वाहनातील पेट्रोल चोरीला जाण्याचे प्रमाण वरचेवर वाढत असून दुचाकी वाहन ही चोरीस जाण्याचा प्रकार घडला होता. सततच्या चोरीच्या घटना घडत असल्याने त्यावर आळा बसणार आहे. व चोर पकडण्यात पोलीस यंत्रणेला ही मदत होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

झेंडे गल्ली परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या हेतूने बसवण्यात आले असून यामध्ये कोणालाही दुखावण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न नसून समाजकार्य म्हणून हे कॅमेरे बसविण्यात आले आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्या होणाऱ्या चोरीच्या घटनेवर आळा बसणार आहे तसेच भविष्यात एखादी अनुचित घटना घडू नये व घडल्यास त्याला जबाबदार असणारे यांची ओळख पटावी याकरता स्वखर्चाने हे कॅमेरे बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close