ईतरसामाजिक

लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे मध्ये भव्य फुलांची सजावट

"विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी" विठ्ठल भक्तांसाठी दीपावली निमित्त मंदिर सजले

संपादक – दिनेश खंडेलवाल 

लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे मध्ये भव्य फुलांची सजावट

“विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी” विठ्ठल भक्तांसाठी दीपावली निमित्त मंदिर सजले

पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला सणावाराबरोबरच महत्त्वाच्या दिवशी आकर्षक फुलांची तसेच विद्युत रोषणाई करून गाभारा व मंदिराला सजवले जाते. या सजावटीत विठ्ठल रुक्मिणीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी विठ्ठल भक्त गर्दी करतात. श्री विठ्ठलाचे वारकरी भाविक हे “विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी असे मानतात. कारण श्री विठ्ठलाचे राज्यात नेहमीच आनंद आणि उत्साह असतो. या राज्यात राहणाऱ्या लोकांना दिवाळीच्या सणाची वाट पाहावी लागत नाही, कारण त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रकाश आणि आनंद असतो. विठोबाच्या भक्तांसाठी दिवाळी हा एक विशेष सण आहे, ज्यामध्ये ते विठ्ठलाची पूजा करतात आणि त्याच्या आशीर्वादाने आनंदी राहतात. विठोबाचे राज्य म्हणजे केवळ एक भौतिक स्थान नाही, तर एक आध्यात्मिक अवस्था आहे जिथे भक्तांना शांती आणि आनंद मिळतो.

विठोबाचे राज्य आणि दिवाळी यांचा संबंध असा आहे की विठोबाचे राज्य म्हणजे एक अशी अवस्था जिथे दिवाळीचा आनंद आणि प्रकाश नेहमीच असतो. अशा
दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे.

सदर सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे दिड ते दोन हजार किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत.

या फुलांमध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब,ऑर्किड, अँथोनीयम,जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.

मंदिरातील श्री.विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार या सर्व भागात कलात्मक सजावट करण्यात आली आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.

या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close