
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सध्या खासगी वाहनांना बस स्थानकातून प्रवासी नेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे परंतु पंढरपूर सोलापूर कडे जाणारी परीक्षार्थी विद्यार्थी, कामगार वर्ग व इतर प्रवाशांना वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याने आता पंढरपूर सोलापूर चा प्रवास रीक्षांमधून करायचा असल्यास ३०० रुपये तर खाजगी वाहन क्रूजर मधून करायचे असल्यास १५० व १८० रुपये द्यावे लागत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
खाजगी वाहन धारक मात्र आरटीओकडून मेमो दिले जात असल्याचा बनाव करत प्रवाशांकडून ही लूट सुरू केली आहे. कारण विचारले असता प्रवाशांमध्ये कोविडचे दोन्ही डोस पूर्ण न घेतलेले प्रवासी असल्याने आमच्यावर दोन हजार रुपयाचा मेमो फाडला जातो असे सांगितले जाते. दरम्यान दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहन धारकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी वर्ग मात्र मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. वाहन चालक व मालकांच्या अशा वागण्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
खाजगी वाहन धारकांकडे प्रशासन लक्ष देईल का?
बस स्थानकातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहनांना प्रवासी नेण्यासाठी मुभा देण्यात आली असल्याने मनमानी कारभार खाजगी वाहनधारकांचा सुरू आहे. खाजगी वाहन धारक रिक्षा चालक हे मात्र प्रवाशांची लूट करताना दिसत असून पंढरपूर सोलापूर साठी आता १५० पासून ३०० रुपये पर्यंतचे मनमानी भाडे आकारले जात असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत असतानाच संबंधित प्रशासन आरटीओ,रापम, पोलीस प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होताना दिसत आहे. प्रवाशांची मनमानी लूट करणाऱ्या खाजगी वाहनधारकांकडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न आता प्रवाशांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. अशावेळी मात्र प्रवासी संघटना मूग गिळून गप्प बसले की काय असेही बोलले जात असल्याने वाहनधारकांकडून केली जाणारी लूट कोण थांबवणार? याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com