ईतर

दहा लाख वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरीत ६५ एकर मध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

मोफत महाआरोग्य शिबिरासाठी प्रा.शिवाजी सावंत,अनिल सावंत सक्रिय

संपादक-दिनेश खंडेलवाल

    जाहिरात…….‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ जाहिरात….. जाहिरात

दहा लाख वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरीत ६५ एकर मध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

मोफत महाआरोग्य शिबिरासाठी प्रा.शिवाजी सावंत,अनिल सावंत सक्रिय

पंढरपूर :: कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे दहा लाख भाविक येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. या भाविकांना आरोग्य विभागाच्या वतीने 65 एकर परिसरामध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. अशी माहिती प्रा.शिवाजी सावंत, अनिल सावंत यांनी दिली.

या महाआरोग्य शिबिरात जास्तीत जास्त वारकरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. वारकऱ्यांची भाविकांची मोफत आरोग्य तपासणी व्हावी त्यांची सेवा घडावी या हेतूने सावंत बंधूंची” आरोग्य यंत्रना आता सज्ज झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. प्रा.शिवाजी सावंत यांच्या नियोजनामुळे आषाढी वारीतील महाआरोग्य शिबिराची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. प्राध्यापक शिवाजीराव सावंत तसेच भैरवनाथ शुगर्स चे चेअरमन अनिल सावंत यांच्या माध्यमातून या महाआरोग्य शिबिराची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून एका छताखाली प्रतिबंधात्मक उपचार, निदानात्मक उपचार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरामध्ये आवश्यक शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था ,स्वच्छता, सुरक्षा ,पार्किंग ,स्वच्छता ग्रह, सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा, आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरात अतिदक्षता विभाग सेंटर 6, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 3, प्राथमिक उपचार केंद्र 11, आरोग्य दुत 20, रुग्णवाहिका 7, 24 तास वार रूम कार्यरत राहणार आहे. या शिबिरासाठी 2500 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारी कालावधीमध्ये गर्दीच्या ठिकाणी अथवा कोठेही भाविकाला काही त्रास होऊ लागल्यास त्यांनी या मोफत असलेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहनही यावेळी संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close