ईतर

पंढरीत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव

सात जिल्ह्यातील समाज बांधव येणार, जैन समाजाचे भव्य आयोजन

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : – सकल जैन समाज पंढरपूर आणि श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सकल जैन समाज सोलापूर ,पुणे,सातारा,उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आणि मुंबई या सात जिल्ह्यांची सर्वोदयी विश्व धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर 2621 व्या जन्म कल्याणका निमित्त श्री 1008 भगवान महावीर जन्म कल्याण प्रभावना महोत्सव पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने प पू गणिती आर्यिका 105 शांतमती माताजीं यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सन 2022 चा भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव गुरुवार 14 एप्रिल 2022 रोजी होत आहे.गत नऊ वर्षांपासून सोलापूर, पुणे, सातारा,उस्मानाबाद,नगर, बीड व मुंबई या सात जिल्ह्यातील श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय संस्था आणि सकल जैन समाजाच्या माध्यमातून एकत्रित भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव साजरा केला जात आहे .त्यास अनुसरून यंदाचा भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव रविवार 17 एप्रिल 2022 या दिवशी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे .

भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार असून यावेळी क्रांती महिला मंडळ , सुमनश्री महिला मंडळ व पद्मावती महिला मंडळ यांची दिंडी असून स्वयंसिद्ध महिला मंडळाचे लेझीम पथक ,सन्मती सेवादल पंढरपूर तर्फे भक्ती गीताचा कार्यक्रम, शुभश्री महिला मंडळाचा गरबा नृत्य,महावीर ढोल पथक पंढरपूरचे ढोल पथक आणि सिद्धश्री महिला मंडळ यांचा पोवाडा , स्वानुभुती मंडळाचे मंगलाचरण,पालवी येथील बालकांचा कार्यक्रम असणार आहे.

शोभायात्रा सकाळी 11.45 च्या सुमारास
तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे विसर्जित होऊन तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर येथील भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्याची शोभा वाढवावी अशी विनंती पंढरपूर सकल जैन समाज आणि श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, अध्यक्ष वीरकुमार दोशी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, पंढरपूर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार,पार्श्वनाथ दिगंबर जैन महावीरनगर (फडे जैन मंदिर), श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागर नगर,त्रिलोक तीर्थक्षेत्र शेगाव दुमाला यांच्यावतीने करण्यात आली आहे .

जैन सोशल ग्रुप,सन्मती सेवा दल पंढरपूर,महावीर युवा सेना, जैन चँरिटेबल ट्रस्ट, जैन युवा फेडरेशन,भारतीय जैन संघटना पंढरपूर शहर व तालुका ,पद्मावती महिला मंडळ ,सुमनश्री महिला मंडळ, क्रांती महिला मंडळ, सिद्धश्री महिला मंडळ, युनिक क्रांती महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला मंडळ, स्वानुभुती महिला मंडळ, शुभश्री महिला मंडळ पंढरपूर तसेच श्री सन्मती सेवादल बहुद्देशीयअल्पसंख्यांक संस्था यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी ,सकल जैन समाजाचे सहकारी हे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close