ईतर

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात फुल विक्रीसाठी जागा उपलब्ध करणेबाबत मा.आ.प्रशांत परिचारक यांना निवेदन–अमोल डोके

कॉरीडॉरमुळे फुलविक्री व्यवसाय अडचणीत;जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

संपादक दिनेश खंडेलवाल

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात फुल विक्रीसाठी जागा उपलब्ध करणेबाबत मा.आ.प्रशांत परिचारक यांना निवेदन–अमोल डोके

कॉरीडॉरमुळे फुलविक्री व्यवसाय अडचणीत;
जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

पंढरपूर : तिर्थक्षेत्र पंढरपूर परिसरातील संपुर्ण माळी समाजाचा फुलशेती व हार, तुळशीहार, फुल विक्री मुख्य व्यवसाय असून संपुर्ण माळी समाजाची उपजिविका या व्यवसायावरती अवलंबून आहे. मात्र नव्याने होणाऱ्या कॉरिडॉरमुळे हा व्यवसाय अडचणीत येत असून व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुर्वी तुळशीमाळ व फुलांचे हार विकणे हे मंदिरामध्ये चालत असे परंतू सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरामधील फुलविक्री बंद करणेत आली व फुल विक्रेत्यास मंदिराच्या बाहेर फुल विक्री करण्यासाठी सांगितले.

दरम्यान भविष्यातील होणारा कॉरीडॉरमुळे फुलविक्री व्यवसाय अडचणीत येणार असून फुल विक्रेत्यांना
जागा उपलब्ध व्हावी अशा अशायाचे निवेदन मा.आ.प्रशांत परिचारक व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी मा.अरविंद माळी यांना दिले आहे.

भविष्यातील होणाऱ्या कॉरिडॉरमुळे फुल विक्रेत्यास मंदिर परिसरात फुल विक्री करण्यास बंदी केल्यास फुल विक्री करणाऱ्या असंख्य कुटुंबास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. तरी भविष्यातील होणाऱ्या कॉरीडॉरच्या बांधकामामध्ये फुलविक्रेत्यास तुळशीमाळ व फुलांचे हार विकणेसाठी कायमस्वरूपी जागा किंवा कट्टे उपलब्ध करून मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी अमोल डोके, सचिन शिंदे, अक्षय देवमारे, आबा खरडकर, विजय देवमारे, गणेश शिंदे, महेश डोके, बाळु देवमारे आदी पदाधिकारी व फुल विक्रेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close