महिलांना सक्षम बनवण्यासाठी दिवाळी एक्सपोचे आयोजन – दिलीप बापू धोत्रे
पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली;मनसे ऍग्रो इंडस्ट्रीज व आद्य वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम

संपादक – दिनेश खंडेलवाल
महिलांना सक्षम बनवण्यासाठी दिवाळी एक्सपोचे आयोजन – दिलीप बापू धोत्रे
पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली;मनसे ऍग्रो इंडस्ट्रीज व आद्य वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम
पंढरपूर(प्रतिनिधी):- दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या एक्सपो २०२४ चे उदघाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शोभा कराळे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, शशिकांत पाटील, अनिल बागल, अप्पा करचे, बाबा चव्हाण, गणेश पिंपळनेरकर, सागर कांबळे इत्यादी उपस्थित होते.
पंढरपूर येथील नागरिकांना दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी व महिलांना सक्षम बनवण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे एक्सपो २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४०० स्टॉल धारक नागरिकांना मोफत सुसज्ज स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज व आद्य वीरशैव महिला मंडळाच्या या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की महिलांना सक्षम बनवण्यासाठी या एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
या माध्यमातून तीनशे महिला सक्षम करण्याचे काम मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील काळात महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास उपस्थित महिलांना दिला.
एक्सपो उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आद्य वीरशैव महिला मंडळाच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शोभा कराळे यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी एक्सपोचे आयोजक मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याचे सांगत. पुढील काळात सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणार नेतृत्व म्हणून दिलीप धोत्रे यांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. ]