सामाजिक

त्या महाराजांना तालुका पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने काढले बाहेर

पाण्याने वेढलेल्या महादेव मंदिरात अडकले होते तिन महाराज

संपादक – दिशेने खंडेलवाल 

त्या महाराजांना तालुका पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने काढले बाहेर

पाण्याने वेढलेल्या महादेव मंदिरात अडकले होते तिन महाराज

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे हद्दीत असलेल्या चंद्रभागेच्या पात्रात मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेलेले तीन महाराज अडकले चोहोबाजूने मंदिराला पाण्याने वेढा घातल्याने महाराजांना तिथून बाहेर येता येईना दरम्यान सदरची घटना प्रशासनात समजताच तालुका पोलीस स्टेशन, तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करून अडकलेल्या तीन साधूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

याबाबत अधिक माहिती अशी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुरसाळे गावानजीक भीमा नदी पात्रात महादेवाचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेलेले कृष्णानंद महाराज जाधव (वय ७५) वर्षे राहणार नाशिक, सुभाष संभाजी धवन (वय ४५) राहणार गुरसाळे, विठ्ठल रामभाऊ लोकरे (वय ५२ वर्षे) राहणार गुरसाळे हे पावसाच्या पाण्याने आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात अडकले मंदिराभोवती पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने त्यांना तिथून बाहेर पडता येत नव्हते.

सदरची माहिती मिळताच तहसीलदार सचिन लंगुटे, तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले पोलीस हवालदार सागर गवळी ,पोलीस हवालदार गजानन माळी, पोलीस हवालदार विजयकुमार आवटी, व पोहण्यामध्ये सराईत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे इतर लोक यांच्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी गुरसाळे नदीपात्राच्या नजिक जाऊन पथकास बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले.

सदर पथकाने घटनास्थळी जाऊन अडकलेल्या तीनही महाराजांना सुरक्षितपणे अडकलेल्या ठिकाणाहून पुराच्या पाण्यातून बाहेर आणले यावेळी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठे गर्दी केली होती. वेळीच आपत्ती व्यवस्थापन पथक तालुका पोलीस स्टेशन बचाव पथक व महसूल चे पथकाने अथक परिश्रम घेऊन बाहेर काढण्यात यश मिळवले यासाठी नागरिकांतून त्यांचे आभार मानण्यात येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close