अन्यायावर वाचा फोडून न्याय देण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे- घुले
संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

संपादक-दिनेश खंडेलवाल
अन्यायावर वाचा फोडून न्याय देण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे- घुले
संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
पंढरपूर : पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्य यांचा पुष्पहार, फेटा परिधान करून शनिवार दि.७जानेवारी रोजी सायंकाळी ७वा. करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर शहराध्यक्ष शनी महाराज घुले यांच्य हस्ते नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पंढरपूर शहराध्यक्ष दत्ताजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवी शेवडे, उपाध्यक्ष रफीक आतार, कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, खजिनदार चैतन्य उत्पात, सचिव बाहुबली जैन, नागेश काळे, विश्वास पाटील, प्रसिद्धीप्रमुख रामकृष्ण बिडकर आदी मान्यवरांचा सत्कार केला.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून पत्रकार हे आपल्या लेखणीतून समाज घडवण्याचे कार्य करतात त्याचबरोबर पत्रकारांच्या लेखणीमुळे समाज परिवर्तनाबरोबरच अन्यायावर वाचा फोडून न्याय देण्याची ताकद ही दिसून येते. अशा सर्व पत्रकारांचा “पत्रकार दिनाच्या” निमित्ताने आज सन्मान करताना मनस्वी खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहराध्यक्ष शनी महाराज घुले यांनी व्यक्त केली.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष नवा काटे,अनिल मिसाळ, साहिल शेटे, ऋत्विक अलंकार, सनी क्षीरसागर, लखन जगताप, बाळू माने, राहुल बोरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.