रोपळे गटातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला- सुभाषराव माने
जी. प. सदस्य सुभाषराव माने यांचा भव्य नागरी सत्कार व विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : प्राध्यापक सुभाष बाबुराव माने यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त भव्य नागरी सत्कार व विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सुभाषराव माने म्हणाले की जिल्हा परिषदेच्या रोपळे गटातील १३ गावासाठी नेत्यांच्या व आमदारांच्या सहकार्यातून १३ कोटीचा निधी खेचून आणला व विकास कामे केली.
त्यावेळी विजयकुमार देशमुख हे संपर्क मंत्री होते.जिल्हाचे पालकमंत्री होते. पाणीपुरवठ्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि आ. बबन दादांच्या प्रयत्नातून ११ कोटी चा निधी जिल्हा परिषद गटातील सात गावासाठी मिळाला यातून विकास करण्यात आला. तर चाळीस वर्ष तुंगत सारख्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता दहा दहा वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले पण पाण्याचा प्रश्न सुटला नव्हता. तेव्हा प्रशांतराव परिचारक यांनी माझ्या सभेमध्ये सरपंच आग्तराव या ठिकाणी आहेत. त्यांच्यासमोरच शब्द दिला की पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला गावात पाणी आणल्याशिवाय मी तुमच्या गावात पाय ठेवणार नाही आणि या गावासाठी एक कोटी ३७ लाखाची पाणीपुरवठा योजना युवतीच्या तळ्यावरून प्रशांतराव परिचारक यांनी आणि आमदार बबन दादांनी भगीरथ प्रयत्न करुन त्या ठिकाणी मंजूर केरुन पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
विकास कामे करताना प्रशांत परिचारक यांनी कधी विरोधक पाहिले नाही फक्त गाव पाहून विकासाची कामे केली विकास कामे मिळवण्यासाठी आमची पूर्वतयारी होत असे व त्याप्रमाणेच आम्ही विकास निधी खेचून आणून या 13 गावांमध्ये विकास घडवून आणला. माझ्यासारख्या गरीब माने कुटुंबांवर स्वर्गीय आमदार श्रीमंतयोगी सुधाकर पंत परिचारक यांनीच राजकारणामध्ये आमच्या कुटुंबाला आणले. राजकारण व कौटुंबिक संसार कसा करायचा त्यांनीच शिकवला तसेच ईश्वर वठार येथे शाळा त्यांनीच काढून दिली. त्यामुळेच आज आमच्या कुटुंबाला व इथल्या जनतेला चांगले दिवस आले आहेत अशी प्रतिक्रिया सुभाषराव माने यांनी व्यक्त केली.
प्रा. तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने यांनी रोपळे गटातील १३ गावांसाठी विविध विकास कामासाठी अधिक निधी खेचून आणला आहे. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांनी एवढा मोठा निधी आणून विकास कामे केली नाहीत ते फक्त सुभाषराव माने यांनाच जमले आहे.
सुभाषराव माने यांनी गट तट पक्ष न पाहता अनेक गावांना विकास कामात मोठी मदत केली आहे.
सुभाषराव माने यांना व त्यांच्या सुविद्यपत्नी यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांनी या पुढेही जनतेची अशीच कामे करावित अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
याप्रसंगी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी जमलेल्या गर्दीवर लक्ष वेधून म्हणाले की सुभाषराव माने यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाची ही गर्दी म्हणजे पोहच पावती आहे.
अकरा किलो चांदीची गदा देऊन सुभाषराव माने सर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी रोपळे गटातील सर्व नागरिक हितचिंतक यांनी मोठी गर्दी केली होती.