कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत साधला आ. आवताडेंनी संवाद
आ. समाधान आवताडे यांची जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव येथे प्रचार दौरा

संपादक – दिनेश खंडेलवाल
कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत साधला आ. आवताडेंनी संवाद
आ. समाधान आवताडे यांची जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव येथे प्रचार दौरा
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान दादा आवताडे यांनी तीन वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात केलेल्या कल्याणकारी योजना व विकास कामे जनतेसमोर मांडत संवाद साधला व एक क्रमांकाच्या कमळ या बटनासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विविध गावातील जनतेसमोर केले.
जगलंगी ,बावची, खवे ,यड्राव या गावांमध्ये केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” यांनी विविध गावाला भेट दिली. यावेळी समाधान दादांनी राबवलेल्या विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेल्या गावांमधील कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा व महायुती तसेच मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. समाधान दादा यांनी आपल्या अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली, तसेच विकसित व सक्षम मतदारसंघ बनविण्याकरिता २० तारखेला महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे असे आवाहन या निमित्ताने समाधानदादा यांनी केले.
सदर प्रसंगी श्रीमती रुख्मिणीताई दोलतोडे, प्रवीण खांडेकर, दीपक भोसले, जमदाडे सर, राजेंद्र सुरवसे, दिपक भोसले, सरपंच आमसिध्द चोखेडे, निगोंडा पाटील, मल्लाप्पा चोखेडे, रंगाप्पा चोखेडे, आप्पू कस्तुरे, सिदमल चौघुले, राजू भोसले, अंकुश चोपडे आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.