राजकिय

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ. समाधान आवताडे

विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार वर्ग

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ. समाधान आवताडे

विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार वर्ग

पंढरपूर(प्रतिनिधी):- मंगळवेढा तालुक्यातील
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता त्या शेतकऱ्यांनी एकूण ७५२ हेक्टर क्षेत्रावर हा फळ पिक विमा भरला होता.

यामध्ये द्राक्षासाठी ३०५ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना १ कोटी ८९ लाख २४ हजार २२७ रुपये मंजूर झाले आहेत. आंबा उत्पादक ३५ शेतकऱ्यांना तसेच डाळिंब उत्पादक ६६४ शेतकऱ्यांना मिळून ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये मंजूर झाले आहेत.

एकूण १००४ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आंबे बहार फळपीक विमा मंजूर झाला असून ही मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close