राज्यातील शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणार – दिलीप धोत्रे
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

संपादक – दिनेश खंडेलवाल
राज्यातील शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणार – दिलीप धोत्रे
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील
शिक्षक शिक्षिका या बंधू-भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी व्यक्त केली. या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत. या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आलेली आहे. तिचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आलेल्या शिक्षिका भगिनीने जे मत व्यक्त केले त्या आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की ८० टक्के आदिवासी मुलं हे शिक्षण घेत आहेत आणि अशा दुर्गम भागात असलेल्या या शिक्षका भगिनींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे दिलीप बापू धोत्रे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२ जणांना मनसे नेते व सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप धोत्रे पुढे बोलताना म्हणाले की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. आपल्या कोणत्याही अडीअडचणी समस्या सांगा आम्ही त्या अडचणीचे,समस्येचे निरसन केल्याशिवाय राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.
यावेळी अशोक कोळी, मनोज साळुंखे, बाळकृष्ण लाड, बाळासाहेब आवारे, परशुराम घाडगे, धुंडनना कोळी, मंगल मुळीक, जयश्री जमादार, वीरसंगप्पा भोज, युवराज जगताप, संतोष कोळी, विनायक शेळके, शरद काळे, सुरेश महानुर, अविनाश पाटील यांच्यासह पंढरपूर-मंगळवेढा येथील शहर व तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.