ईतर

तुळशी वृंदावन उद्यानातील माहिती मिळणार क्यु आर कोड मधून

वनविभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ यांची माहिती

संपादक-दिनेश खंडेलवाल

तुळशी वृंदावन उद्यानातील माहिती मिळणार क्यु आर कोड मधून

वनविभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ यांची माहिती

पंढरपूर : संतांचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पंढरी नगरीत तुळशी वृंदावन च्या माध्यमातून अनेक संतांच्या प्रतिमा व माहिती वारकरी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली एक अतिशय सुंदर असे प्रेक्षणीय स्थळ म्हणून तुळशी वृंदावन कडे पाहिले जाते याच तुळशीवरून दान ची माहिती आता येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकांना बारकोड मध्ये मिळणार आहे.

तुळशी वृंदावन उद्यान भाविकांसह स्थानिक नागरिक, पर्यटकांसाठी दि.८ जानेवारी २०२४ पासून खुले करण्यात आले असून. तुळशी वृंदावन उद्यानातील भित्ती चित्र, संत मुर्ती आणि इतर सर्व गोष्टींची माहिती पर्यटकांना सहजतेने वाचता व ऐकता येणार आहे. यासाठी वन विभागामार्फत प्रत्येक भित्ती चित्राजवळ क्यु आर कोड लावण्यात आले असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली.

ऑनलाईन पद्धतीने tulashi.solapurturisum.in या वेबसाईटचा वापर करून सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते तसेच मोबाईल मधुन क्यु आर कोड स्कॅन करून देखील माहिती वाचता व ऐकता येईल.

सद्यस्थितीत सर्व माहिती ही मराठी भाषेमध्ये उपलब्ध असुन लवकरच इंग्रजी भाषेमध्येही उपलब्ध करण्यात येणार आहे. सदरचा उपक्रम उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे.

या वेबसाईटवरील माहिती ही विविध तज्ञ व्यक्तींकडून तपासून घेतलेली आहे. तरी सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तसेच अधिक माहितीबाबत काही सुचना असल्यास rfopandharpur@gmail.com या ईमेल वर भाविकांनी, नागरिकांनी तसेच पर्यटकांनी संपर्क साधावा असे आवाहन वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close