राम सातपुते यांना दोन लाखाचे लीड देऊ- दिलीप धोत्रे
महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील - दिलीप धोत्रे

संपादक-दिनेश खंडेलवाल
राम सातपुते यांना दोन लाखाचे लीड देऊ- दिलीप धोत्रे
महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील – दिलीप धोत्रे मनसे नेते
पंढरपूर :- उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
दिलीपबापू धोत्रे पुढे बोलताना म्हणाले की राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विना अट आपला पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारने केलेल्या कार्याला पाठिंबा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे ठरवलेले आहे.
मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असलेले राम मंदिर, त्याचप्रमाणे ३७० कलम हे हटवून त्यांनी खूप मोठे आणि चांगले काम केलेले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना जाचक असलेला तीन तलाक हा कायद्या रद्द केला आहे .या सर्व गोष्टीचा विचार करून भारत देशाला जागतिक स्तरावर उच्च पदावर नेण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकतात. म्हणून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मनसेच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे. असे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी प्रचार सभेत सांगितले.
यावेळी बोलताना लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते म्हणाले की प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्याच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे.
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग हे हजारो कोटी रुपये खर्च करून बनवले आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाला मंजुरी तसेच निधी ही मंजूर केलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरे बांधून दिली आहेत. गोरगरिबांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,व प्रशांत गिड्डे ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, पंढरपूर तालुकाअध्यक्ष शशिकांत पाटील विधानसभा अध्यक्ष अनिल बागल. महेश खिस्ते यांनी सभेला संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.